धामणगाव रेल्वे: सिनेमा चौक रेल्वे स्टेशन येथे रेल्वे चढताना महिलेचा अपघात; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेने मिळाले जीवनदान
भगत की कोटी सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये चढताना एका महिलेचा पाय घसरल्याने गंभीर अपघात झाला. या दुर्घटनेत संबंधित महिलेचा एक पाय निकामी झाला असून, रेल्वे पोलीस व स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे तिला तात्काळ उपचार मिळाले. त्र्यंबकेश्वर, नाशिक येथील जाधव नावाच्या महिलेला रेल्वे चढताना तोल गेल्याने ती गाडीखाली पडली. या प्रसंगी रेल्वे पोलीस कर्मचारी हेड कॉन्स्टेबल संजय बोरुडे, एएसआय रणधीर खांडेकर आणि नागरिक मोहम्मद इरशाद उर्फ सोनू यांनी विलक्षण तत्परता दाखवली. कुठलीवाट न पाहता दवाखान्यात नेले