छत्रपती संभाजी नगर नाका येथे बस सी एन जी भरून जात असताना पाई चालणाऱ्या इसमाला धडक बसल्याने ते खाली पडला व त्याचा जागीच मृत्य झाला. मयत बाळू सुखदेव अहिरे वय ५० वर्ष राहणार मीनाताई ठाकरे स्टेडियम पंचवटी हे सकाळी १२ च्या दरम्यान छत्रपती संभाजी नगर नाका येथे आले असता सी एन जी भरून जात असताना रस्ता ओलांडत असलेल्या इसमाला जोरदार धडक बसली व त्याच्या नावावरून गाडीचे चाक गेले असता तो जागीच दगावला नागरिकांनी धाव घेत त्या इसमाला बाहेर काढले व शासकीय रुग्णालयात दाखल केले असता मयत घोषित केले