अशातच आता मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात ओबीसी समाजाने बीडमध्ये एल्गार पुकारलायं. आज बीडमध्ये महा एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे, या मेळाव्यात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, "एक जीआर निघाला आम्ही कोर्टात गेलो सोना समाज, नाभिक समाज, कुणबी समाज माळी संघ महासंघ समता परिषद माझे वकील उभे आहे. आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत. एकतर न्यायदेवतेकडे आणि दुसरा जो आमच्याच बापाचा आहे.