कळंब: संजीतपुर येथील तेरणा नदीला पुर,गावचा संपर्क तुटला
कळंब तालुक्यात मुसळधार पाऊस बरसत असुन राञी झालेल्या पावसामुळे दि.15 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता संजीतपुर येथील तेरणा नदीला पुर आला आहे.त्यामुळे संजीतपुर गावातील पुल पाण्याखाली गेला आहे.गावाला जा ये करण्यासाठी असलेला एकमेव पाण्याखाली गेल्याने गावाचा संपर्क तुटला असुन परीसरातील सोयाबीन पीकाच मोठ नुकसान झाल आहे.सोयाबीन शेतात पाणी पाणी पाहायला मिळत आहे.