राजूरा: राजुरा जनसंपर्क कार्यालयात पाटण येथील काँग्रेस व गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश
भाजपा एकमेव पक्ष असून लोकाभिमुख कार्य हाच भाजपाचा विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले. जिवती तालुक्यातील पाटण येथील ग्रामपंचायतीच्या सदस्यांसह काँग्रेस व गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी राजुरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात आज दि 1 नोव्हेंबर ला 12 वाजता भारतीय जनता पक्षात प्रवेश करून भाजपाचा झेंडा हाती घेतला. त्यावेळी आमदार भोंगळे बोलत होते.