आज दिनांक 12 डिसेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान अण्णाभाऊ साठे चौक परिसरात आगामी महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाकडून शुक्रवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नवनियुक्त संपर्क प्रमुख तथा माजी राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी निवडणुकीच्या संदर्भाने चर्चा करण्यात आली. युती करायची का नाही हे वरिष्ठ होणार असल्याची प्रतिक्रिया संपर्कप्रमुख सिद्धराम म्हेत्रे यांनी दिली. युतीने झाल्यास स्वतंत्र लढणार असल्याचे ते म्हणाले.