नागापूर येथील श्री क्षेत्र थापलिंग गडावर खंडोबा देवाच्या यात्रेत नवसाचे ५५१ बैलगाडे धावले, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नी किरण वळसे पाटील यांनी गडावर जाऊन खंडोबा देवाचे दर्शन घेतले.