भोकरदन: गोदरी येथे पु.अहिल्यादेवी होळकरच्या जयंती मिरवणुकीत झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ छ.शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको
आज दिनांक 5 जून 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये धनगर समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे, दिनांक 31 मे 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती मिरवणुकीत काही समाजकंटकांनी मारहाण केली होती त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी ही रास्ता रोको आंदोलन आज भोकरदन शहरात धनगर समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.