खालापूर: वावोशी परिसरात भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू, एक जखमी
वावोशी गावच्या हद्दीत मंगळवारी (दि. 11 नोव्हेंबर) रात्री नऊ दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृत तरुणाची ओळख कौशल म्हात्रे (रा. पेण) अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कौशल म्हात्रे हा JSW कंपनीत काम करत होता. काम संपवून तो आपल्या सहकाऱ्यासह मोटारसायकलवरून पेणकडे घरी जात असताना वावोशी परिसरात हा अपघात झाला. अपघातानंतर दोघांनाही तातडीने उपचारासाठी पेण येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.