पारोळा: पारोळा येथे आज श्री बालाजी महाराजांचा रथोत्सव
जळगाव जिल्ह्यामधील पारोळा येथील श्री बालाजी महाराजांची रथयात्रा महाराष्ट्रातील सर्वात उंच रथयात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. ही जत्रा साधारणपणे नवरात्रीनंतर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशीच्या भरते आणि यात महाराष्ट्रातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. आज दिनांक ३ ऑक्टोंबर रोजी श्री बालाजी महाराजांच्या रथ दुपारी साडेबारा वाजेपासून काढण्यात आला.