नवीन वर्षात वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात ढगा आणि राहाटी या ठिकाणांहून सफारीसाठी दोन नवीन गेट सुरू करण्यात येणार आहेत. या दोन्ही गेटवरून पर्यटकांना चार तासांचा निसर्गरम्य ट्रॅक अनुभवता येणार असून, सेल्फी पॉईंट, वॉच टॉवरसह विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.सध्या बोरधरण आणि अडेगाव या दोन गेटमधूनच सफारीची सुविधा उपलब्ध असून, आता नव्या गेटमुळे पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सफारीसाठी ऑन