पातुर: पातूर तालुक्यात मोठी खळबळ! "गणेशपूजा केल्यास आदिवासींचे आरक्षण धोक्यात येईल" अशी खोटी अफवा सोशल मीडियावर व्हायरल
Patur, Akola | Sep 17, 2025 पातूर तालुक्यात मोठी खळबळ! "गणेशपूजा केल्यास आदिवासींचे आरक्षण धोक्यात येईल" अशी खोटी अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली. या अफवेच्या दबावाखाली पाचरणसह काही गावांतील तरुणांनी वेळेआधीच गणेशमूर्तींचे विसर्जन केले. या प्रकारानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, पातूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम १९६ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सोशल मीडियावर पसरलेल्या अफवेने गावांमध्ये निर्माण भीती निर्माण झाली होती.