हिंगोली: शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा परिषद निवडणुका शिवसेनेच्या उमेदवार मुलाखती संपन्न
येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या वेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर हे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी विविध ठिकाणांहून आलेल्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेतली व स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली.