पनवेल: पनवेल महानगरपालिकेत ‘लोकशाही दिन’ निमित्त नागरिकांच्या तक्रारींचे निवारण
Panvel, Raigad | Nov 3, 2025 सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी व समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयातील बैठक कक्षामध्ये आज दिनांक ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गादर्शनाखाली ‘लोकशाही दिनाचे’ आयोजन करण्यात आले. आजच्या बैठकित नागरी सेवा सुविधा विभाग व इतर असे चार अर्ज दाखल झाले होते, या अर्जाची दखल घेऊन नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यात आल्या. या कार्यक्रमास परिवहन विभाग व्यवस्थापक कैलास गावडे ,उपायुक्त डॉ.वैभव विधाते,उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, उपायुक्त स्वरूप खारगे, उपायुक्त मंगला माळवे, उपायुक्त नानासाहेब कामठे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने, प्रभाग अधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.