मोहाडी: गांधी वार्ड करडी येथे हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या दारू विक्रेत्याविरुद्ध करडी पोलिसात गुन्हा दाखल
मोहाडी तालुक्यातील गांधी वार्ड करडी येथे दि. 23 सप्टेंबर रोज मंगळवारला सायं.7 वा. करडी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी दिगंबर गायकवाड याला ताब्यात घेत आरोपीच्या ताब्यातील 20 लिटर हातभट्टीची दारू असा एकूण 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध करडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.