साकोली सेंदूरवाफा,पवनी,तुमसर,भंडारा या भंडारा जिल्ह्यातील4नगरपरिषदेच्या निवडणुका 2 डिसेंबरला पार पडणार आहेत त्या अनुषंगाने 2 डिसेंबरला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात येत असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकारद्वारे जिल्हा निवडणूक अधिकारी सावंत कुमार यांनी शनिवार दि 29 नोव्हेंबरला दुपारी3वाजता दिली आहे ही सुट्टी मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामानिमित्त मतदार संघाबाहेर असतील त्यांना लागू राहील. तसेच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही लागू राहील