अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. शिवसेना ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्रित निवडणूक लढविणार हे निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील उमेदवारींची यादी केव्हा जाहीर होणार, या बाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी स्पष्ट सांगितले.