चिखलदरा: भगवान बीरसा मुंडा भवन टेंब्रूसोंडा येथे सेवा पंधरवाडा अंतर्गत विशेष कार्यशाळा संपन्न
भारतीय जनता पार्टी चिखलदरा दक्षिण मंडळद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर ते २ सप्टेंबर २०२५ दरम्यान सेवा पंधरवाडा अंतर्गत टेंब्रूसोंडा येथील भगवान बिरसा मुंडा भवन येथे आज दुपारी ४ वा विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.कार्यशाळेचे अध्यक्ष मेळघाट क्षेत्राचे आ.केवळराम काळे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते.या कार्यशाळेत सेवा पंधरवाडा अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार असून त्याची रूपरेषा तयार करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.