अंबाजोगाई: घाटनांदुर येथे पोलिसांचा छापा 12 किलो गांजा जप्त, एकास केले अटक
घाटनांदूर येथील अण्णाभाऊ साठे चौका जवळील एका घरावर छापा मारून बारा किलो गांजासह एकास ताब्यात घेण्यात आले असून (ता.८) रोजी एक वाजता अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात पुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) येथे मोठ्या प्रमाणात गांजाची साठवणूक करून चोरून विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस अधीक्षक यांच्या आदेशावरून बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे.