समुद्रपूर: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसंबधी शिवणफळ येथे विद्यार्थ्याकडून गावात करण्यात आली जनजागृती
समुद्रपूर तालुक्यातील शिवणफळ येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजने अंतर्गत गाव स्तरीय हवामान आराखडा तयार करून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढून जनजागृती केली यावेळी कृषी साय्यक राम अरगडे, महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा सरस्वस्ती पुरके, मिशन समृद्धीचे अक्षय देशमुख, माजी उप सरपंच कृष्णा उमाटे पोलीस पाटील सुनील भोयर, प्रगतीशील शेतकरी अरुण शिंदे, पत्रकार गजानन गारघाटे आदिसह जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.