समुद्रपूर: ताडगाव येथे शेतकरी पुत्राचा विहिरीत पडुन दुर्दैवी मृत्यू, गिरड पोलिस ठाण्यात मर्ग दाखल
ताडगाव येथे विहीरीवर जनावरांना पाणी पाहण्यासाठी गेले २७ वर्षीय शेतकरी पुत्राचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. प्राप्त माहितीनुसार मृत्यक शेतकरी पुत्र प्रफुल्ल उदयभान ढोणे वय २७ वर्ष हा नेहमीच प्रमाणे आपली बैलजोडी व गायीला चारून विहिरीवर पाणी पाजण्यासाठी घेऊन आला.यावेळी तो विहिरीचे पाणी काढत असतांना बैल व गायीची टक्कर झाली. यावेळी गायीला बैलाने धक्का मारल्याने गायीचा धक्का लागून प्रफुल्ल ढोणेचा विहीरीत पडून पाण्यात बुडवून मृत्यू झाला.