पालघर: शिवरायांच्या वेशभूषेत वसई किल्ला येथे व्हिडिओ चित्रीकरणासाठी आलेल्या तरुणाला सुरक्षारक्षकांनी अडवले; व्हिडिओ व्हायरल
वसई किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत व्हिडिओ चित्रीकरणासाठी आलेल्या एका तरुणाला सुरक्षारक्षकांनी अडवले. या घटनेवर संतप्त तरुणाने सुरक्षारक्षकाला मराठी येत नसल्याबाबत संताप व्यक्त केला. प्री-वेडिंग शूट, रील चित्रीकरण करणाऱ्या तरुणाईकडे सुरक्षा रक्षक दुर्लक्ष करतात मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा वेशभूषा व्हिडिओ चित्री करण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळी त्याला अडवले जाते. असे म्हणत संताप व्यक्त केला असून घटनेचा व्हिडिओ वायरल झाला आहे.