जळगाव जामोद: जळगाव ते नांदुरा रोडवर येरळी पुलावर चारचाकी व दुचाकीची धडक, एकाचा मृत्यू तर एक गंभीर स्वरूपात जखमी
आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी जळगाव ते नांदुरा रोडवर येरळी पुलावर नांदुरा कडून जळगाव कडे येणाऱ्या चार चाकी वाहन व नांदुराकडे जाणारे दुचाकी वाहन यांची धडक झाली यामध्ये मंगेश घाइट व राजू घाइट हे दोघे गंभीर स्वरूपात जखमी झाले, त्यांना उपचारासाठी नेत असताना रस्त्यानेच राजू घाइट यांचा मृत्यू झाला, तर मंगेश घाइट यांना उपचारासाठी अकोला येथे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.