अकोला: शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन.
Akola, Akola | Sep 28, 2025 अकोला शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जुने शहर परिसरात पथसंचालनाची पूर्वतयारी म्हणून पारंपारिक वेशभूषेत भव्य रॅली काढण्यात आली. जय हिंद चौक सुविधा मेडिकल अगरवेसपासून काळा मारुती मंदिरापर्यंत निघालेल्या या रॅलीचे ठिकठिकाणी महिलांनी रांगोळ्या काढून व पुष्पवृष्टी करून स्वागत केले. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शेकडो पदाधिकारी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.