मारेगाव: विविध मागण्याना घेऊन मारेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचा आक्रोश मोर्चा, तहसीलदार यांना दिले निवेदन
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी, तालुका मारेगाव यांच्या वतीने दिनांक २५ सप्टेंबर रोजी 'कार्यकर्ता मेळावा व आक्रोश मोर्चा' चे आयोजन करण्यात आले. या मोर्चात समाजातील विविध स्तरांतील नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.