कल्याण वालधुनी पुलाखाली आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गुढ उकलले आहे. पोलीस तपासात धक्कादायक घटना उघड झाली आहे. मयत मुलाचे ग्रॅज्युटीचे पैसे देत नाही म्हणून सासूने मित्राच्या मदतीने केली सुनेची हत्या केली. कल्याण महात्मा फुले पोलिसांनी 24 तासात गुन्ह्याचे उकल करत सासू लताबाई गांगुर्डे सह तिचा मित्र जगदीश म्हात्रे यांना बेड्या ठोकल्या आहेत. या संदर्भात एसीपी कल्याण घेटे यांनी आज दिनांक 3 जानेवारी रोजी दुपारी 3च्या सुमारास माहिती दिली आहे.