राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्ह्यांसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. मात्र, नागपूर जिल्ह्यातील मतदारांसाठी एक महत्त्वाची स्पष्टोक्ती समोर आली असून, या निवडणूक टप्प्यात नागपूरचा समावेश नाही.13 जानेवारीला दुपारी चार वाजताच्या सुमारास राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची घोषणा केली आहे.जाहीर झालेल्या निवडणुका केवळ १२ जिल्ह्यांसाठी मर्यादित आहेत.