एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी घडली. प्रेमप्रकरणातून संतापलेल्या तरुणाने दोन साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केले. ही घटना शनिवारी (दि. १) दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास हिंजवडी येथील शेल पेट्रोल पंपाजवळ घडली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.