बीड शहरातील धानोरा रोडवरील पालवन चौकाजवळ सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी शुक्रवार दि 19 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता, कारवाई केली आहे. गुप्त माहितीनुसार PSI पल्लवी जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने संबंधित इमारतीवर धाड टाकली. या कारवाईत दोन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना पुढील चौकशीसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे.PSI पल्लवी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरासह जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू असून, त्यामुळे