भंडारा नगर परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर झाला असून, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मधुरा मदनकर यांनी ४,१०८ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत नगराध्यक्षपदाला गवसणी घातली आहे. चौरंगी आणि अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत मदनकर यांना एकूण १८,७२७ मते मिळाली. त्यांनी आपल्या प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या जयश्री बोरकर (१४,६७९ मते) यांचा पराभव केला, तर शिंदे सेनेच्या अश्विनी भोंडेकर यांना १३,१०३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुषमा साखरकर यांना ४,३९० मते मिळाली.