वरोरा: आनंदवन चौक येथे शेतकऱ्याचे जेलभरो आंदोलन ;प्रशासनाची तारांबळ उडाली
वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शेतकरी ओल्या दुष्काळामुळे त्रस्त असून, शासनाने कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही आणि शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप करत शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वात जेलभरो आंदोलन आज दि 30 सप्टेंबर ला 2 वाजता आनंदवन चौक येथे करण्यात आले. बाजार समितीचे संचालक नितीन मत्ते आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात चिमूर रोडवरील आनंदवन चौकामध्ये शेतकऱ्यांनी रोड जाम करून सरकार विरोधी घोषणा देत रस्ता बंद केला.