मोताळा: सिंदखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाचा शुभारंभ
मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथे 20 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाचा भव्य शुभारंभ आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाला. शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ गावागावातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे, प्रत्येक लाभार्थ्याला त्याचा हक्काचा न्याय मिळवून देणे आणि शेतकरी, कामगार, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाचा प्रत्येक लाभ पोहोचवण्याचा संकल्प या उपक्रमातून साध्य होत आहे.