अमरावती: राष्ट्रपिता म. गांधी जयंती व पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा ची भाजपची कार्यशाळा संपन्न
देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी जन्मदिवस तसेच 2 ऑक्टोंबर रोजी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या कालावधीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने "सेवा पंधरवडा अभियान" राबविले जाणार आहे.या सेवा पंधरवडा अभियानाच्या पार्श्वभूमीवर दिनांक १२ सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीण ची भाजपा कार्यशाळा भाजपा कार्यालय राजापेठ अमरावती येथे कार्यशाळा संपन्न झाली. या जिल्हा कार्यशाळेला भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रमुख उपस्थिती होती.