अकोला: बाळापूर नगरपरिषद निवडणूक पुढे ढकलली, 4 डिसेंबरला नवा कार्यक्रम जाहीर.जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती.
Akola, Akola | Nov 30, 2025 बाळापूर नगरपरिषद निवडणूक पुढे ढकलली. अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगरपरिषदेची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असतानाच नामांकनासंदर्भातील एका वादामुळे निवडणूक प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला होता. बाळापूर येथील एका उमेदवाराने नामांकन अर्जावर आक्षेप घेत जिल्हा न्यायालयात याबाबत अर्ज दाखल केला होता. या याचिकेवरील निकाल 1 डिसेंबरला अपेक्षित असल्यामुळे पुढील प्रक्रिया वेळखाऊ ठरणार असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले होते.