खालापूर: खोपोली नगरपरिषदेत ‘आप’कडून प्रभाग 10 मधून वैशालीताई वाघमारे रणांगणात
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी खोपोली नगरपरिषद निवडणुकीसाठी सज्ज झाली असून, शहरात परिवर्तनाचा इतिहास घडवण्याची तयारी ‘आप’कडून सुरू आहे. प्रभाग क्रमांक 10 मधून वैशाली विवेक वाघमारे या आम आदमी पार्टीच्या महिला उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता प्रबळ झाली आहे.