पोंभूर्णा: पोंभुर्णा येथे ८३ लक्ष रुपयांचा घनकचरा टेंडर घोटाळा, पत्रपरिषदेत विरोधी नगरसेवकांचे मुख्याधिकारी, नगराध्यक्षावर आरोप
पोंभूर्णा नगर पंचायत अंतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान सन २०२५-२६ योजने अंतर्गत घनकचारा व्यवस्थापनाचे प्रस्तावित ८३ लक्ष ५१ हजार ८५० रुपये इतकी अंदाजपत्रकीय किंमत असलेल्या कामाबाबतचा विषय सभेत न ठेवता गैरमार्गाचा अवलंब करून सर्वानुमते ठराव मंजुर असल्याचा खोटा ठराव लिहून मुख्याधिकारी व नगराध्यक्षानी टेंडरमध्ये घोटाळा केल्याचा गंभीर आरोप विरोधी नगरसेवकांनी दि. १५ सप्टेंबरला वनविभागाचे व्हीव्हीआयपी विश्रामगृहात केला.