जळगाव शहरातील जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या परिसरात शनिवारी १७ जानेवारी दुपारी २ वाजता एक अत्यंत थरारक आणि हृदयद्रावक घटना घडली. धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाने रक्ताने माखलेल्या अवस्थेत थेट पोलीस ठाणे गाठले आणि हल्लेखोरांच्या अटकेसाठी तिथेच ठिय्या मांडला. सत्यजित गायकवाड असे या जखमी तरुणाचे नाव आहे.