नागपूर ग्रामीण: चिंतेची बाब: आयआयआयटी नागपूरच्या विद्यार्थ्याची परीक्षेच्या पहिल्याच दिवशी आत्महत्या
देशातील नामांकित तंत्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. ताजी घटना भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT), नागपूर येथे घडली असून, श्रेयश माने या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले.सोमवार, ४ मे रोजी श्रेयशची परीक्षा सुरू होणार होती, त्याच दिवशी पहाटे अंदाजे साडेचार वाजता च्या सुमारास त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. श्रेयश गेल्या काही दिवसांपासून वर्गात अनुपस्थित होता.