गंगापूर: छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू
वैजापूरकडे वळण घेणाऱ्या कंटेनरने सत्यभामा यांना जोराची धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ यांच्या रुग्णवाहिकेतून सत्यभामा जाधव यांना जखमी अवस्थेत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.