भंडारा: मांडवी येथील वैनगंगा नदीपात्रात सापडला बेपत्ता परराज्यातील व्यक्तीचा मृतदेह; आत्महत्येचा संशय
4 दिवसांपासून घरून बेपत्ता झालेल्या परराज्यातील इसमाचा मृतदेह भंडारा तालुक्यातील मांडवी येथे वैनगंगा नदीपात्रात आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. जितेंद्र विठोबाजी करकाळे (वय ५२) रा. खैरलांजी, जि. बालाघाट राज्य मध्य प्रदेश असे मृतकाचे नाव आहे. त्यांनी तणावामुळे आत्महत्या केली असावी, असा अंदाज कुटुंबियांनी वर्तविला आहे. जितेंद्र करकाळे १० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता घराबाहेर गेले होते, पण सायंकाळपर्यंत परत आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला.