कर्जत: कर्जत येथून शेगावला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसला इगतपुरीत भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
Karjat, Raigad | Nov 1, 2025 कर्जत-दहिवली येथून शेगावला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसला इगतपुरी येथील बोगद्यात भीषण अपघात झाला. या अपघातात बस चालक आणि एका भाविकाचा मृत्यू झाला असून, अन्य प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी सकाळी झाला. बस चालक दत्ता धाकवड यांचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस सुरक्षित कठड्याला धडकली. या अपघातात चालक दत्ता धाकवड यांचा जागीच मृत्यू झाला, तर बसमधील भाविक प्रवासी सुरेश अण्णा लाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.