हवेली: वाकड पोलीस स्टेशन हद्दीत शेडगे वस्ती परिसरात भीषण आग,35-40 गाड्या जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही
Haveli, Pune | Oct 21, 2025 वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेडगे वस्ती परिसरात आज पहाटेच्या सुमारास एका इलेक्ट्रिक दुचाकी सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग लागली. गझेबो हॉटेलच्या मागे असलेल्या बजाज कंपनीच्या एथर इलेक्ट्रिक दुचाकी गाड्यांच्या सर्व्हिसिंग सेंटर असलेल्या पत्र्याच्या गोडाउनला पहाटे 3.00 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.