जालना: जालना महापालिकेचा अतिक्रमण हटाव मोहीमेचा धडाका; बस स्टँड परिसर मोकळा.
वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवली; नागरिकां
Jalna, Jalna | May 24, 2026 जालना महापालिकेचा अतिक्रमण हटाव मोहीमेचा धडाका; बस स्टँड परिसर मोकळा. वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवली; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा सूर.. आज दिनांक 24 रविवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी व नागरिकांच्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर जालना महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र केली असून आज बस स्टँड परिसरातील उर्वरित अतिक्रमणे हटवण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील रस्ते मोकळे झाले असून वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला आहे.