औंढा नागनाथ: डॉ.संपदा मुंडे यांच्या हत्येचा तपास करून खऱ्या गुन्हेगारास अटक करा,मानवी हक्क अभियान चे औंढा तहसील कार्यालय येथे निवेदन
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे हत्या झालेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हत्येतील गुन्हेगाराचा तपास करून यामधील खऱ्या गुन्हेगारास तात्काळ अटक करून मुंडे कुटुंबीयांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी मानवी हक्क अभियान हिंगोली जिल्हाध्यक्ष राधिका चिंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 6 नोव्हेंबर गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता औंढा नागनाथ तहसील कार्यालय येथे तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.यावेळी रमेश सानप सह इतर उपस्थित होते.