जालना: लोंढेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आषाडी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी काढली दिंडी
Jalna, Jalna | Jul 5, 2025 जालना तालुक्यातील लोंढेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शनिवार दि. 5 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता आषाडी एकादशीनिमित्त गावातून दिंडी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारुन अनेकांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिंडीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वारकर्यांचा पेहराव करुन गावातून दिंडी काढली. ही दिंडी गावकर्यांसाठी आकषण ठरली. दरम्यान विद्यार्थ्यांनी अभंगाच्या तालावर थिरकून आनंद व्यक्त केला.