आपण मंत्र्यांचे भाचे आहोत तुम्हाला थेट मंत्रालयातून कामे मंजूर करून देतो असे आम्हीच दाखवत एकाने नगर मधील अनेक शासकीय ठेकेदारांकडून लाखो रुपये घेत त्यांचे फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे दोन ठेकेदारांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे या दोघांची नऊ लाख 40 हजारांची फसवणूक झाली आहे याबाबत सचिन गोरख रासकर यांनी 14 ऑक्टोबर रोजी दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे