महाराष्ट्र शासनाने क्रीडा धोरण अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत जिल्हयातील उत्कृष्ट क्रीडापटू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांच्या कार्याचे योगदानाचे मुल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येते. यासाठी 30 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले.