श्रीवर्धन: श्रीवर्धन तालुक्यातील वडघर येथे श्री खेतुरपाल मंदिर सभागृह भूमिपूजन सोहळा
आज शनिवार दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत श्रीवर्धन तालुक्यातील वडघर येथे श्री खेतुरपाल मंदिर सभागृह भूमिपूजन सोहळा पार पडला. याप्रसंगी माजी आमदार तुकाराम सुर्वे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार तटकरे यांनी संबोधित करताना, म्हटले की, गावाचे ग्रामदैवत श्री खेतुरपाल मंदिर सभागृह भक्तीभावाने उभारले जाणार असून, यानिमित्ताने मी सर्व ग्रामस्थ व देवस्थान मंडळाचे अभिनंदन करतो. येत्या होळी सणाचे औचित्य साधत, आपण मुंबईकरांच्या उपस्थितीत ह्या सभागृहाचे उद्घाटन करणार आहोत.