पुलगाव येथील नागपूर फैलात वॉर्ड क्र.13 येथे काल द्रौपदाबाई श्रावणजी सांगोले यांच्या घराला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्यात आली. यावेळी अपर तहसीलदार स्नेहा क्षीरसागर व नगर परिषदचे मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांच्यासह परिस्थितीचा आढावा घेतला. बाधित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.