शिरूर कासार: लंपी आजाराबाबत शेतकऱ्यांनी जनावराची काळजी घ्यावी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.नरोटे यांचे आवाहन
लंपीच्या आजाराबाबत शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर नरोटे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. जनावरांचे गोठे रोज स्वच्छ आणि कोरडे ठेवावेत. चारा आणि पाण्याचे भांडे स्वच्छ ठेवावेत. गोठ्याभोवती डास, माशा, गोचीड यांचे नियंत्रण करावे. यासाठी कीटकनाशक फवारणी करता येते. संक्रमित जनावर वेगळे ठेवा आजाराची लक्षणे (त्वचेवर गाठी, ताप, दूध घट, डोळ्यातून पाणी येणे) दिसणारे जनावर ताबडतोब वेगळे ठेवावे.असे आवाहन केले आहे.